High FD interest rate: कोणती बँक FD वर सर्वाधिक व्याज देत आहे, पहा संपूर्ण यादी
High FD interest rate: तुम्हीही बँक एफडीमध्ये (Bank FD) गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. या रिपोर्टमध्ये आम्ही त्या बँकांबद्दल सांगणार आहोत ज्या बँक एफडीवर सर्वाधिक व्याज देत आहेत. यामध्ये आम्ही स्मॉल फायनान्स बँका, सरकारी बँका आणि खाजगी बँकांचा समावेश केला आहे.
कोणत्या बँका FD वर सर्वाधिक व्याज देत आहेत | High FD interest Rate
FD म्हणजे मुदत ठेव (Fixed Deposit). हे बँका किंवा नॉन-बँकिंग वित्तीय कंपन्यांद्वारे प्रदान केलेले एक आर्थिक साधन आहे, जिथे एखादी व्यक्ती पूर्वनिर्धारित व्याज दराने विशिष्ट कालावधीसाठी रक्कम जमा करू शकते. बँक एफडीवर सर्वाधिक व्याज देणाऱ्या बैंक खाली दिलेल्या आहे:
1. युनिटी स्मॉल फायनान्स बँक (Unity Small Finance Bank)
युनिटी स्मॉल फायनान्स बँक सामान्य गुंतवणूकदारांना 4.5 टक्के ते 9 टक्के व्याज देत आहे. त्याचबरोबर ज्येष्ठ नागरिकांना बँक 4.5 टक्के ते 9.5 टक्के व्याज देत आहे. बँकेकडून सर्वाधिक व्याज 1001 दिवसांच्या FD वर दिले जाते, जे सामान्य गुंतवणूकदारांना 9 टक्के आणि ज्येष्ठ गुंतवणूकदारांना 9.5 टक्के व्याज आहे.
2. सूर्योदय स्मॉल फाइनेंस बँक (Suryoday Small Finance Bank)
सूर्योदय स्मॉल फायनान्स बँक सामान्य गुंतवणूकदारांना 4 टक्के ते 8.6 टक्के आणि ज्येष्ठ नागरिकांना 4.5 टक्के ते 9.1 टक्के व्याज देत आहे. बँका दोन वर्षांपेक्षा जास्त आणि तीन वर्षांपेक्षा कमी कालावधीच्या FD वर सामान्य गुंतवणूकदारांना 8.6 टक्के आणि ज्येष्ठ गुंतवणूकदारांना 9.1 टक्के व्याजदर देत आहेत.
3. डीसीबी बँक (DCB)
खाजगी क्षेत्रातील DCB बँकेकडून सामान्य गुंतवणूकदारांना 3.75 टक्के ते 7.9 टक्के व्याज मिळत आहे. ज्येष्ठ नागरिकांना 4.25 टक्के ते 8.50 टक्के व्याज दिले जात आहे. हे दर 27 सप्टेंबर 2023 पासून लागू झाले आहेत.
4. स्टेट बँक ऑफ इंडिया (State Bank of India)
देशातील सर्वात मोठी बँक SBI देखील FD गुंतवणूकदारांना आकर्षक व्याज देत आहे. SBI कडून, सामान्य गुंतवणूकदारांना 7 दिवस ते 10 वर्षांच्या FD वर 3.00% ते 7.10% पर्यंत व्याज मिळत आहे. त्याच वेळी, ज्येष्ठ गुंतवणूकदारांसाठी बँकेतील व्याज 3.5 टक्के ते 7.6 टक्के आहे.
5. एचडीएफसी बँक (HDFC Bank)
एचडीएफसी बँक सामान्य गुंतवणूकदारांना 3 टक्के ते 7.20 टक्के व्याज देत आहे. ज्येष्ठ नागरिकांना बँकेत एफडी केल्यास 3.5 टक्के ते 7..75 टक्के व्याज मिळत आहे. HDFC ने 1 ऑक्टोबर 2023 रोजी नवीन व्याजदर लागू केले.
6. आयसीआयसीआय बँक (ICICI Bank)
खाजगी क्षेत्रातील ICICI बँक गुंतवणूकदारांना 3 टक्के ते 7.1 टक्के व्याज देत आहे. तर ज्येष्ठ नागरिकांसाठी ते 3.50 टक्के ते 7.65 टक्के आहे. आयसीआयसीआय बँकेने शेवटचा High FD interest Rate व्याजदर 16 ऑक्टोबर रोजी बदलला.