Business

सौदी अरेबिया चा IPL मध्ये 5 billion dollars च्या गुंतवणुकीचा प्रस्ताव

Saudi Arabia $5 billion Investment in IPL: क्रिकेटच्या सर्वात रोमांचक आणि आकर्षक स्पर्धेचे आयोजन करणाऱ्या इंडियन प्रीमियर लीगमधील / Indian Premier League (IPL) भागभांडवल खरेदी करण्याची तयारी सौदी अरेबिया ने दाखवली आहे. सौदी अरेबियाने आयपीएल मधील share capital विकत घेण्याची इच्छा व्यक्त केली आहे, ज्याचे मूल्य खूप मोठे आहे.

सौदी अरेबिया चा 5 billion dollars च्या गुंतवणुकीचा प्रस्ताव

सौदी अरेबिया चे क्राउन प्रिन्स मोहम्मद बिन सलमानच्या सल्लागारांनी, भारत सरकारच्या अधिकार्‍यांशी बोलल्यानंतर, आयपीएलला $30 Billion मूल्य असलेली एक होल्डिंग कंपनी बनवण्याचा सल्ला दिला आहे ज्यामध्ये सौदी अरेबिया मोठा हिस्सा खरेदी करू शकेल.

मोहम्मद बिन सलमान सप्टेंबरमध्ये G-20 देशांच्या बैठकीत सहभागी होण्यासाठी भारतात आले होते, त्यावेळी सरकारसोबत याबाबत चर्चा झाली होती. क्राऊन प्रिन्सने 5 अब्ज डॉलर्सच्या गुंतवणुकीचा प्रस्ताव दिला आहे. इंग्लिश प्रीमियर लीग आणि युरोपियन चॅम्पियन्स लीगच्या धर्तीवर आयपीएलचा जगभर विस्तार करण्याचाही त्यांनी प्रस्ताव ठेवला आहे.

भारत सरकार चे याबाबत काय मत आहे?

BCCI कमान सध्या गृहमंत्री अमित शहा यांचे पुत्र जय शाह यांच्याकडे आहे. 2024 मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकीनंतर सौदी अरेबियाच्या या प्रस्तावावर भारत सरकार आणि बीसीसीआय निर्णय घेणार असल्याचे अहवालात म्हटले आहे. जर हा करार झाला तर सौदी अरेबियाच्या सार्वभौम संपत्ती निधीतून (Saudi Arabia’s sovereign wealth fund) गुंतवणूक केली जाईल. Sovereign wealth fund ने यापूर्वी अनेक खेळांशी संबंधित गुंतवणूक केली आहे.

IPL sponsors मध्ये आहे Aramco आणि Saudi Tourism Authority यांचा समावेश

आयपीएल प्रायोजकां मध्ये अरामको आणि सौदी पर्यटन प्राधिकरण यांचा समावेश आहे. 2027 पर्यंत आयपीएल सामन्यांच्या प्रसारणासाठी $6.2 अब्ज दिले गेले आहेत. जे प्रत्येक सामन्यासाठी 15.1 दशलक्ष डॉलर्स म्हणजेच सुमारे 100 कोटी रुपये खर्च करते. जे इंग्लिश प्रीमियर लीगपेक्षा जास्त आहे आणि अमेरिकेच्या नॅशनल फुटबॉल लीगच्या अगदी जवळ आहे.

इंडियन प्रीमियर लीग / Indian Premier League (IPL)

क्रिकेटच्या थरारासह ग्लॅमरचा टच असलेल्या आयपीएलला 2008 साली देशात सुरुवात झाली. गेल्या 15 वर्षांत या आयपीएल संघांच्या मूल्यांकनात मोठी वाढ झाली आहे. बॉलीवूड स्टार्सपासून ते देशातील दिग्गज उद्योगपतींपर्यंत वेगवेगळ्या IPL संघांची बोली लावून खरेदी करण्यात आली.

मुंबई इंडियन्स संघ रिलायन्स इंडस्ट्रीजचा आहे ज्याचे अध्यक्ष देशातील सर्वात श्रीमंत उद्योगपती मुकेश अंबानी आहेत. किंग्स इलेव्हन पंजाबची मालकी बॉलीवूड अभिनेत्री प्रीती झिंटाच्या मालकीची आहे. कोलकाता नाईट रायडर्सची मालकी बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खान आणि जुही चावला यांच्याकडे आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button