Best Air purifiers: 10,000 रुपयांपेक्षा कमी किमतीचे एअर प्युरिफायर
Air purifiers under Rs 10,000: जर तुम्ही दिल्ली मध्ये रहात असाल आणि तुमच्या घरासाठी सर्वोत्तम भेटवस्तू शोधत असाल, तर एअर प्युरिफायर (Air Purifier) हा सर्वोत्तम पर्याय आहे. वाढत्या प्रदूषणामुळे श्वास घेण्याच्या समस्याही वाढत आहेत आणि आजारही वाढत आहेत. अशा परिस्थितीत, एक कार्यक्षम एअर प्युरिफायर या समस्या दूर करू शकतो. हवेची गुणवत्ता सुधारण्यासोबतच हवा शुद्ध होते आणि श्वसनाचा त्रास होत नाही. सर्वोत्तम एअर प्युरिफायर्स ज्यांची किंमत 10,000 रुपयांपेक्षा कमी आहे.
10,000 रुपयांपेक्षा कमी किमतीचे एअर प्युरिफायर (Air purifiers under Rs 10,000)
जर तुम्हीही तुमच्या घरातील किंवा कार्यालयातील प्रदूषणाला तोंड देण्यासाठी स्मार्ट एअर प्युरिफायर खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर येथे काही पर्याय आहेत जे तुम्ही पाहू शकता.
1. Philips AC121520
हे उपकरण 677 चौरस फुटांपर्यंतच्या खोल्यांमध्ये काम करू शकते. हे HEPA फिल्टर आणि NanoProtect Pro फिल्टरसह येते. हे प्युरीफिर 11 मिनिटांपेक्षा कमी वेळेत घरातील अदृश्य व्हायरस, ऍलर्जी किंवा प्रदूषक फिल्टर करते. कंपनीच्या वेबसाईट नुसार हे 32 m² पर्यंतच्या खोल्या शुद्ध करते आणि 270 m³/h याचा स्वच्छ हवा दर आहे. हे पोर्टेबल रूम एअर प्युरिफायर फ्लिपकार्टवर 8,999 रुपयांपासून सुरू होते आणि दोन वर्षांची वॉरंटी देते.
2. Sharp Room FP-F40E-W
हे प्युरिफायर 320 चौरस फूट खोलीसाठी योग्य आहे. यामध्ये HEPA फिल्टर आणि सक्रिय-कार्बन फिल्टर आहे. सेटिंग मध्ये ऑटो मोड, मिस्ट मोड, ऑटो रीस्टार्ट आणि डस्ट सेन्सर हे फीचर्स दिले आहे. Sharp चा दावा आहे की ते 99.97 टक्के अशुद्धता पकडू शकते. एअर प्युरिफायरची किंमत फ्लिपकार्टवर 9,499 रुपयांपासून सुरू होते.
3. Honeywell Air Touch V2 Portable Air purifier
हे प्युरिफायर 388 चौरस फूट खोलीसाठी एक चांगला पर्याय आहे. कंपनी एक वर्षाच्या फिल्टर लाइफचा दावा करते. फ्लिपकार्टवर त्याची सुरुवातीची किंमत 7,299 रुपये आहे.
4. Voltas VAP36TWV
Amazon वरील तपशीलानुसार, एअर प्युरिफायरमध्ये धुण्यायोग्य प्री-फिल्टर, कार्बन फिल्टर, H-13 HEPA फिल्टर आहे. व्होल्टास युनिट 7,540 रुपयांपासून सुरू होते आणि Amazon India वर उपलब्ध आहे.
5. Mi Smart Air Purifier 4 Lite
एअर प्युरिफायर 463 चौरस फुटांपर्यंतच्या खोल्यांसाठी योग्य आहे. हे HEPA फिल्टर आणि इतर स्मार्ट वैशिष्ट्ये देते. Xiaomi Smart Air Purifier 4 Lite चे कव्हरेज क्षेत्र 25 ते 43 स्क्वेअर मीटर पर्यंत आहे, तर Pro मॉडेलचे क्षेत्रफळ 35 ते 60 चौरस मीटर कव्हर करते. हे फ्लिपकार्टवर 8,999 रुपयांना विकले जात आहे.
6. Kent 15008 UV Air Purifier
हे स्मार्ट गॅझेट 430 चौरस फूट खोलीच्या आकारात काम करू शकते. यामध्ये ऍडव्हान्स HEPA फिल्टर आहे जे 2.5 particulate matter काढून टाकते आणि 0.3 मायक्रॉनपेक्षा जास्त आकाराचे 99.97% वायु प्रदूषक काढून टाकण्यासाठी 3-stage यंत्रणा वापरते. Amazon वर त्याची किंमत 10,999 रुपयांपासून सुरू होते.